चायनीज खाताना पुन्हा एकदा विचार करा ; ९ जणांना विषबाधा

शहापूर : रायगड माझा वृत्त 

खर्डी येथे चायनीज हॉटेलमधील पदार्थ खाल्ल्याने ९ जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. खर्डी गावातील बाजारपेठमधील चायनीज सेंटरमध्ये या 9 जणांनी चायनीजचे पदार्थ खाल्ल्याने त्यांना काही वेळातच मळमळ सुरू होऊन उलट्या झाल्या.

विषबाधा झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत, या सर्वांना खर्डीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, येथील आरोग्य केंद्रात अधिक उपचार मिळू न शकल्याने बाधित रुग्णांना शहापूर मधील उपजिल्हारुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती शासकीय रुग्णालयातील डॉक्टरने दिली.

या चायनिज हॉटेल मालक अजय यादवला पोलिसांनी अटक केली आहे. वैद्यकीय यंत्रणा आणि आपत्ती विभाग घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही विषबाधा नक्की कशी झाली याबद्दल पोलीस कसून तपास करत आहे. दरम्यान, सर्व रुग्णांची पोलीस चौकशी करणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही दुकानात झाल तेव्हा तिथली स्वच्छता आणि खाद्यपदार्थ बघून खा. त्याने तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचं खाणं टाळा कारण आधीच साथीच्या रोगांचं प्रमाण वाढतं असल्यामुळे आपल्या आरोग्याशी न खेळता स्वच्छ ठिकाणी खाण्यासाठी जावा.

वैशाली बरोरा, संदेश बरोरा, स्वामी झोले, राजश्री पवार, अनंता धापटे, यशोदा धापटे आणि वंदना धापटे असं विषबाधा झालेल्यांची नावं आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत