चार वाहनांच्या अपघातात दोन ठार

Accident

पारनेर : रायगड माझा वृत्त

नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्‍यातील जातेगाव घाटात आज सकाळी पावणेसातच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. ही चारही वाहने एकमेकांवर आदळून एका मोटारीतील दोन जण जागीच ठार झाले. ते दोघेही राहुरीचे असून, प्रसाद रावसाहेब उंडे (वय 32) व भास्कर रंगनाथ डावखर (वय 60), अशी मृतांची नावे आहेत.

नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्‍यातील जातेगाव घाटातून आज सकाळी साडेसहाच्या सुमारास एक मोटर (एमएच 16 बीवाय 6097) पुण्याकडे जात होती. तिच्या मागे आरामबस (एमपी 09 एफए 0045) व तिच्या मागे उंडे व डावखर यांची मोटर (एमएच 17 एजे 2507) चालली होती. त्यांच्या मागे ट्रक (एमएच 16 क्‍यू 1947) होता. पुढची मोटर थांबल्याने आरामबसने ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागील बाजूने येणाऱ्या उंडे व डावखर यांच्या मोटारीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातग्रस्त मोटर पुढच्या आरामबसखाली घुसली. आरामबस आणि ट्रक यांच्यामध्ये मोटारीचा चक्काचूर झाला. धडक अतिशय जोराची असल्याने एअर बॅग उघडूनही अपघातग्रस्त मोटारीतील उंडे व डावखर वाचू शकले नाहीत. मृत प्रसाद उंडे राहुरी येथील ज्येष्ठ विधिज्ञ रावसाहेब उंडे यांचे चिरंजीव होत. प्रसाद यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील व भाऊ, असा परिवार आहे. पासपोर्टच्या कामासाठी ते डावखर यांच्यासह पहाटे पाच वाजता राहुरीहून पुण्याला निघाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत