चालू बाइकवर सेल्फी काढताना दोघांचा मृत्यू

दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for signature bridge in delhi

बाइक चालवताना सेल्फी काढणाऱ्या दोन युवकांचा बाइकवरून पडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर घडली आहे. दोघांची ओळख अजून पटली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मृत तरुण उत्तर दिल्लीतील उस्मानपुराचे रहिवासी असल्याचं बोललं जातंय. मात्र, त्यांच्याजवळ कोणतंही ओळखपत्र सापडलेलं नाही. हे दोघेही आज सकाळी अत्यंत भरधाव वेगाने गाडी चालवत सिग्नेचर ब्रिजवरून जात होते. बाइक वेगात असतानाच ते सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी तोल जाऊन त्यांची गाडी दुभाजकावर आपटली आणि ते खाली कोसळले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सध्या या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत