चिंचवडमध्ये झोपडपट्टीत आग, दोघांचा मृत्यू

 

चिंचवड : रायगड माझा वृत्त 

पुण्यातील चिंचवड येथील दळवीनगर झोपडपट्टीत काल रात्री सिलिंडरच्या स्फोटामुळं भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय.

दळवीनगर झोपडपट्टीत काल रात्री भीषण आग लागली. सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली. या पुण्यातील चिंचवड येथील दळवीनगर झोपडपट्टीत काल रात्री सिलिंडरच्या स्फोटामुळं भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. दळवीनगर झोपडपट्टीत काल रात्री भीषण आग लागली. सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली. या आगीत पाच झोपड्या जळून खाक झाल्या. तर प्रदीप मोटे आणि शंकर क्षीरसागर या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत