चिंचवड ते रायगड सायकल वारी

रायगड माझा वृत्त 

वाकड – पिंपरी-चिंचवड शहरातील उच्च शिक्षित तरूण-तरुणींनी चिंचवड ते रायगड 135 किलो मीटर सायकल रॅली काढली. हंटर्स ट्रेकिंग अँड सोशल क्‍लबकडून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये क्‍लबच्या विविध वयोगटांतील 50 तरुण-तरुणींनी स्वत:हून सहभाग नोंदवला होता. सकाळी पाच वाजता थेरगावमधील डांगे चौक येथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रणाम करून रॅलीला सुरुवात झाली. हिंजवडी, माण, पिरंगुट, पौड, ताम्हिणी घाट, निजामपूर मार्गे मुसळधार पावसात अवघड, चढ-उतार पार करत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत रॅली रायगडावर पोहचली.

रायगडच्या पायथ्यास राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळी नममस्तक होऊन सायंकाळच्या वेळेस रॅलीची सांगता करण्यात आली.
रॅलीमध्ये डॉक्‍टर्स, आयटी प्रोफेशनल्स, व्यावसायिक सहभागी झाले होते. क्‍लब वर्षभर विविध सामाजिक उपक्रम आयोजित करते.रॅली दरम्यान माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. हंटर ट्रेकिंग अँड सोशल क्‍लबचे डॉ. गणेश भोईर, तुषार टाव्हरे, डॉ. प्रवीण कोकडे, डॉ. विजय शिर्के, अशोक पाबळे, डॉ. संतोष भालेराव यांनी रॅलीचे नियोजन केले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत