चित्रपट निर्मात्यानेच केली प्रेयसीच्या नवऱ्याची हत्या!

ओमकार आरणे हत्याकांडाचा खुलासा

पनवेल : साहिल रेळेकर 

प्रेमात अखंड बुडालेल्या एका चित्रपट निर्मात्याने आपल्या प्रेयसीच्या नवऱ्याची हत्या केल्याची घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. नाहुशकुमार कोळी असे या चित्रपट निर्मात्याचे नाव असून त्याने ओंकार अर्णे याची गोळी झाडून हत्या केली आहे. त्याच्या सोशल मीडिया फ्रोफाईलवर तो चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता असल्याचे म्हंटले आहे. दोन मराठी आणि एक भोजपुरी चित्रपटाची निर्मिती केलेला नाहुशकुमार एका हिंदी चित्रपटाची करत होता .

पनवेल माथेरान रस्त्यावर २८ एप्रिलला पोलिसांना एक मृतदेह सापडला. नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून बेपत्ता झाल्याची नोंद असलेल्या कुठल्याही व्यक्तिशी या मृतदेहाचे वर्णन जुळत नव्हते. या मृतदेहाच्या डोक्यावर आणि पाठिवर गोळी लागल्याच्या जखमा होत्या. पुण्याच्या येरवडा पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ति बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्या व्यक्तिच्या वर्णनाशी पनवेल पोलिसांना सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन जुळत होते.

जेव्हा पोलिसांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन मृतदेहाचे फोटो दाखवले तेव्हा त्याच्या भावाने लगेच ओळखले . याबाबत अधिक चौकशी करताच ओंकार आणि त्याच्या पत्नीचे नेहमी भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या भांडणाचे कारणही प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यातूनच या घटनेची उकल झाली.

नाहुशकुमार हा पनवेल उल्वा येथे राहत आहे. त्यानेच ओंकार अर्णे याला त्याच्या पत्नीसह पनवेलला बोलावले. त्यानंतर पनवेलला आलेला ओंकार तिथेच थांबला आणि त्याची पत्नी पुण्याला गेली. यानंतर नाहुशकुमार याने आपल्या अंग रक्षकाची बंदूक घेतली आणि ओमकार वर गोळी झाडली.यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अंगरक्षकांच्या मदतीने त्याने ओंकाराचा मृतदेह पनवेल माथेरान रोडवरील निर्जनस्थळी फेकून दिला.

सुरवातीला आपण पनवेलला गेलो नसल्याचे ओंकारच्या पत्नीने सांगितले मग तिच्या मोबाईल लोकेशनची माहिती घेतली असता ती खोटे बोलत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिचाही या कटातील सहभाग उघड झाला. या घटनेनंतर ती फरार होती पण नंतर तिने पनवेल पोलिसांकडे आपला जबाब नोंदविला असल्याची माहिती पुढे आली आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत