चिपळूण : अजगर हत्येप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील तिघे ताब्यात

चिपळूण : रायगड माझा वृत्त

फुरुस (ता. खेड) येथील जंगलात सात अजगारांना एकाच ठिकाणी मारून पुरण्यात आले होते. या प्रकारामुळे खेडसह जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी वन विभागाने गावातील तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

फुरूस फलसोंडा येथे सात अजगरांना एकाच ठिकाणी मारून त्याचा व्हिडिओ वायरल केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी याच गावात एका ठिकाणी जमिनीत या सात अजगरांना मारून पुरल्याचे समोर आले. पुरलेले अजगर बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये ११ फुटांच्या दोन माद्या व सुमारे दहा फूट लांबीच्या पाच नर अजगरांचा समावेश होता. हा प्रकार कोणी केला, याचा वन विभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक आणि वनपाल अनिल दळवी घेत होते. या अनुषंगाने घटनास्थळी वन विभागाला काही पुरावे सापडले होते. त्यावरून तपास करत असताना वन विभागाला तिघांची माहिती मिळाली. त्यांना संशयित म्हणून आज ताब्यात घेण्यात आले.

फुरूस फलसोंडा येथे घडलेल्या घटनेप्रकरणी गावातील तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांची प्राथमिक चौकशी सुरू आहे. त्यांनी कृत्याची कबुली दिलेली नाही, तरीही आमच्याकडून तपास सुरू आहे.

सुरेश वरक, परिक्षेत्र वनाधिकारी, दापोली

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत