चिपीच्या विमानतळावर उतरले गणपती बाप्पा! पहिली हवाई चाचणी यशस्वी

सिंधुदुर्ग : रायगड माझा वृत्त 

पर्यटनासाठी नंदनवन मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेलाय. बहुचर्चित ‘चिपी’ विमानतळावर पहिली हवाई चाचणी पार पडतेय… गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावार हा योग जुळून येतोय.

विमानातून प्रवास करतेय गणेशाची मूर्ती

मुंबई विमानतळावरून श्री गणरायची मूर्ती घेऊन निघालेलं 12 आसनी चार्टर्ड फ्लाईट दुपारी 12.00 वाजल्याच्या सुमारास चिपी विमानतळावर दाखल झालं.

जिल्ह्याचे पालक मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच सिंधुदुर्गवासीय मोठ्या संख्येनं विमानतळावर ही हवाई चाचणी पाहण्यासाठी उपस्थित आहेत. विमानातून येणाऱ्या गणपतीच्या मूर्तीची विमानतळावरच वाजत गाजत स्थापना केली जाणार आहे…

श्रेयवादाचं युद्ध

या हवाई चाचणीवरून जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचे आणि श्रेयवादाचं धुमशानही रंगलंय. केसरकर विरुद्ध राणे हा नेहमीचाच संघर्ष या निमित्तानं पुन्हा पाहायला मिळतोय.

खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह VVIP विमान लँडिंगची केसरकर यांची संकल्पना होती. पण काही तांत्रिक कारणांमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे प्रवाशांशिवाय होत असलेल्या या विमानाच्या हवाई चाचणीवर त्यांना समाधान मानावं लागतंय

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत