चीनने समुद्रात बांधला ८८ मीटर खोलीवर बोगदा

बीजिंग : रायगड माझा ऑनलाईन 

चीनने पुन्हा एकदा इंजिनिअरिंगचे आश्‍चर्यचकित करणारे उदाहरण सादर करताना समुद्राखाली तब्बल 88 मीटर खोलीवर बोगदा तयार केला आहे. 8.1 कि.मी. लांब असलेल्या बोगद्याचा 3.49 कि.मी.चा भाग तब्बल समुद्रात 88 मीटर खोलीवर आहे. संपूर्ण जगातच सर्वात खोल असलेल्या हा सागरी बोगदा ‘क्विंगदाओ ते जिओझाऊ’ या शहरांना जोडतो. हा चिनी बोगदा सध्याचा जगातील सर्वात खोल आणि लांब आहे. जगातील सर्वात लांब पुलाचे लोकार्पण केल्यानंतर चीनने अवघ्या महिनाभरातच या बोगद्याची घोषणा केली आहे.

अनेक आश्‍चर्यकारक प्रकल्प पूर्ण करणार्‍या चीनला हा बोगद्याचा प्रकल्प पूर्णत्वास नेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. प्रोजेक्ट मॅनेजरच्या माहितीनुसार समुद्रात 290 फुटांवर प्रचंड दाब असतो. यामध्ये काम करणे अत्यंत अवघड होते. येथे चौरस मीटरला 300 कारच्या दाबाएवढा दबाव असतो. यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे यश आहे.

हा सागरी बोगदा म्हणजे क्विंगदाओ शहराच्या मेट्रो लाईनचा एक भाग आहे. या शहराला चीनची बीअर राजधानी म्हणूनही ओळखले जाते. सुमारे 37 मैल लांब सबवे लाईनवर 23 थांबे आहेत. या मार्गावर 2020 पासून मेट्रो धावण्यास सुरू होईल. सध्या तेथील लोकांना जिओझाऊ खाडी पार करून जावे लागत होते. मात्र, मेट्रो सुरू झाल्यानंतर हे अंतर अवघ्या सहा मिनिटांत पूर्ण होणार आहे. दरम्यान, तुकीच्या बॉसफोरस खाडीत बांधण्यात आलेला 55 मीटर खोलीवरचा बोगदा सर्वात खोल बोगदा समजला जात असे. मात्र, हा विक्रम आता चीनने मोडला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत