चुकीचं काम केलं नाही, भारतात परतणार नाही: नीरव मोदी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Related image

बँकिंग क्षेत्र तसेच, राजकीय वर्तुळात ‘भूकंप’ घडवणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांचा सूत्रधार असलेल्या नीरव मोदीने उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. ‘मी चुकीचं काहीच केलं नाही, त्यामुळे मी भारतात परतणार नाही,’ असं मोदीनं म्हटलं आहे.

पंजाब नॅशनल बँकेला ठकवून पसार झालेल्या नीरव मोदीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फरार आरोपी घोषित केलं होतं. त्याला फरार घोषित करण्यात आल्याच्या ईडीच्या अर्जाला उत्तर देताना त्याने ही बोंब मारली आहे. मी चुकीचं काहीच केलं नाही. पीएनबी स्कॅम निव्वळ सिव्हिल देवाणघेवाण होती. मात्र या प्रकरणाला वेगळच वळण दिलं जातंय. पण सुरक्षेच्या कारणास्तव मी भारतात येऊ शकत नाही, असं नीरव मोदीनं म्हटलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी ईडीने थायलंडमधील मोदीची १३.१४ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. गेल्या वर्षीच ईडीने मोदीच्या दुबईमधील ५६ कोटींच्या ११ हून अधिक मालमत्तांवर टाच आणली होती. त्याशिवाय गेल्यावर्षीच ऑक्टोबरमध्ये मोदीसह त्याच्या कुटुंबीयांची ६३७ कोटींची संपत्तीही जप्त करण्यात आली होती. त्यात न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमधील दोन अपार्टमेंटचाही समावेश आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत