चेन्नईतील कॉलेजमध्ये लागली वादग्रस्त पेंटिंग्ज, गदारोळानंतर कॉलेज प्रशासनाने मागितली माफी

चेन्नई : रायगड माझा ऑनलाईन 

चेन्नईतील प्रसिद्ध लॉयोला कॉलेजवर वादग्रस्त पेंटिंग्जमुळे जबरदस्त टीका होताना दिसत आहे. सोशल मीडियावरही या पेंटिंग्जमुळे वादाला तोंड फुटलं. या पोस्टरवर भाजप आणि द्रविडी विचारधारांच्या संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या गदारोळानंतर कॉलेज प्रशासनाने माफी मागितली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लॉयोला कॉलेजमध्ये लोक कलाकार उत्सव साजरा होत आहे. या दरम्यान एका चित्र प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं होतं. त्या प्रदर्शनातील काही पेंटिंग्जमध्ये हिंदु धर्मातील प्रतिकांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे. तसंच, या पेटिंग्जमधून संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही चुकीचं चित्रण करण्यात आल्याची टीका होताना दिसत आहे. अशा प्रकारची पेंटिंग्ज ही हिंदूंच्या भावना दुखावणारी असल्याच मत भाजपकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

loyola-college-painting

या पेटिंग्जचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक द्रविडी विचारधारांच्या संघटनांचे कार्यकर्ते आणि भाजपचे समर्थक मोठ्या प्रमाणावर कॉलेजच्या बाहेर जमा झाले. त्यामुळे कॉलेजभोवतीचं वातावरण काही काळ तंग झालं होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने स्वतःची चूक कबूल करत माफी मागितली आहे. आम्ही प्रदर्शन भरवलं हे खरं, मात्र अशा प्रकारचं चित्र इथे लावण्यात आलं असल्याची कोणतीही कल्पना नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत