चोरट्यांनी केली मध्य रेल्वे ठप्प, सिग्नल कंट्रोल वायर चोरली

railway-signal-cr

ठाणे : रायगड माझा वृत्त

दिवसभर मेगाब्लॉकचा ताप सुरू असतानाच रात्री उशिरा टिटवाळा ते आंबिवली दरम्यान चोरटय़ांनी चक्क सिग्नल कंट्रोल करणारी वायरच चोरून नेली. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड निर्माण होऊन लोकलची वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला.

रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. टिटवाळय़ाचे स्टेशन मास्तर आलोकेश रंजन यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठांना कळवले. थोडय़ाच वेळात कर्मचारी, अधिकाऱयांचे पथक दाखल झाले. दुरुस्ती केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. सिग्नल कंट्रोल वायर तोडून ती चोरली जात होती. मात्र हा प्रकार कोणी केला हे समजू शकले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत