चोरट्यांनी पळवली ५ लाखांची अंडी

अंबरनाथ : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for ANDYACHI chori ambernath

१ लाख ४१ हजार नग कोंबड्यांची अंडी ट्रकसह पळवल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. या अंड्यांची किंमत ऐकाल तर तुम्हाला धक्काच बसेल.

या चोरलेल्या अंड्याची किंमत ५ लाखांच्या घरात आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. कर्नाटक राज्यातील जिल्हा बिदर येथून मोहमंद नबी उस्मानसाहेब शेख हा ट्रकचालक त्याचा मुलगा मुजम्मिल सुमारे १ लाख ४१ हजार नग ५ लाख रूपये किंमतीची ती अंडी ट्रकमधून घेवून अंबरनाथकडे निघाले होते.

त्या अंडयाची ऑर्डर महाराष्ट्र एग्ज सेंटर यांच्याकडे द्यायची होती. तो ट्रक पहाटेच्या सव्वा ३ च्या सुमारास अंबरनाथ येथील टी सर्कल ग्रीनसीटीच्या बाजूने येत असताना ट्रकच्या पाठीमागून फोरव्हीलर कार मधून आलेल्या ४ जणांच्या टोळीने तो ट्रक थांबवला.

त्यांनी ट्रकचालक मोहमंद शेख आणि त्यांचा मुलगा यांना ठोशाबुक्कयाने मारहाण करून त्यांच्या डोळयाला कापडी रूमाल बांधून त्यांच्या खिशातील २ हजाराची रोख रक्कम, मोबाईल फोन काढून घेतला. त्यानंतर त्या दोघांना जबरदस्तीने कारमधून नेवून टिटवाळा परिसरातील रायता येथील निर्जन स्थळी जंगलात सोडले.

५ लाखाच्या ट्रकसह ५ लाखाची अंडीही त्या ४ अनोळखी इसमांनी चोरून नेली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत