चौकीदार झोपत नसल्याने चोरांची झोप उडालीय, मोदींचा काँग्रेसवर हल्ला

धर्मशाला : रायगड माझा वृत्त

ज्यांना केवळ लुटण्याचीच सवय लागली होती त्या सर्वांना चौकीदाराची आज भीती वाटते आहे. कारण चौकीदार झोपत नसल्यामुळे चोरांची झोप उडाली आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर येथे जोरदार हल्ला चढवला. ‘वन रँक, वन पेन्शन’च्या प्रश्नावर जवानांची तर कर्जमाफीच्या मुद्दय़ावर शेतकऱयांची काँग्रेसने खोटे बोलून दिशाभूल केली आहे असा आरोपही मोदी यांनी केला.

हिमाचल प्रदेशमधील भाजपचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने धर्मशाला येथे ‘जन आभार रॅली’ घेण्यात आली त्यात पंतप्रधान मोदी बोलत होते. निवडणुकीआधी कर्जमाफीचे आश्वासन देणाऱया काँग्रेसच्या सरकारांनी पंजाब आणि कर्नाटकातील शेतकऱयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ दिलेला नाही. कर्नाटकात तर केवळ 800 शेतकऱयांनाच कर्जमाफी मिळाली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. ‘वन रँक, वन पेन्शन’च्या प्रश्नावर बोलताना मोदी म्हणाले की, जवानांच्या या योजनेसाठी काँग्रेसच्या सरकारने फक्त पाचशे कोटींची तरतूद केली होती, मात्र त्यासाठी 12 हजार कोटींची गरज असल्याचे नंतर सत्तेवर आलेल्या आमच्या सरकारच्या लक्षात आले. मग आम्ही त्या योजनेचे पैसे जवानांना चार हप्त्यांत दिले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत