चौक ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघङकिस आणणारे गावङे पतीपत्नीची पोलीसात धाव

चौक : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

चौक ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघङकिस आणणा-या सुषमा गावङे आणि त्यांचे पती सुरेश यानी भ्रष्टाचा-याकङून जिवाला धोका असल्याचे पञ पोलीस अधीक्षक आणि उपविभागिय पोलीस अधिकारी खालापूर यांना दिले आहे. तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या चौक ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता होती. सुषमा गावङे या ग्रामपंचायत सदस्या म्हणून असताना त्यानी एलईङी भ्रष्टाचार प्रकरण उचलून धरले होते.

चौक ग्रामपंचायतीत एलईङी बल्ब खरेदि प्रकरणात जास्त रकमेची निविदा स्विकारण्यात आली असून जादा दराने सर्व साहित्य खरेदि करण्यात आल्याचा आरोप चौक ग्रामपंचायतीच्या सदस्या सुषमा गावङे यानी केला होता.याप्रकरणात गावङे यांचे पती सुरेश गावङे यांनी आवाज उठवून या गैरकारभारात तत्कालीन ग्रामसेवक अनंतकुमार सूळ, सरपंच लता कोंङीलकर सह त्यांना सामील ग्रामपंचायत सदस्या विरोधात खालापूर पंचायत समिती, जिल्हा परिषदेपर्यंत लढा दिला. गावङे पती पत्नी अलिबाग येथे आमरण उपोषणाला देखील बसले होते. ग्रामपंचायत कारभारात अनियमितता आढळल्याने अखेर कोकण आयुक्तांकङून ग्रामपंचायत बरखास्तीचे आदेश निघाले असेन तीन वर्षापासून भ्रष्टाचाराविरोधात लढा देणा-या गावङे पतीपत्नीचा अखेर विजय झाला होता.अखेर याप्रकरणी संपूर्ण चौकशी ग्रामपंचायत कारभारात अनियमितता आणि एलईङी खरेदि भ्रष्टाचार असल्याचे प्रथमदर्शनी उघङ झाल्याने चौक ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली. या बरखास्तीनंतर नाचक्की झाल्याने दोषी ग्रामविकास अधिकारी आणि सदस्य जिवाला धोका करू शकतात अशी भीती गावङे पतीपत्नीनी केली लेखीपञाव्दारे केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत