चौक ग्रामपंचायत दिव्याखाली अंधार. एलईङी दिवे भ्रष्ट्राचार प्रकरणात माजी सरपंच व ग्रामविकास अधिका-यावर ताशेरे

खालापूर : मनोज कळमकर

चौक ग्रामपंचायतीने पथदिवे खरेदि प्रकरणात दुप्पट पैसे मोजून एलईड़ी दिवे खरेदि केल्या प्रकरणी माजी सरपंच व लता कोंङीलकर व ग्रामविकास अधिकरी अनंतकुमार सूळ जबाबदार असल्याचा अवहाल खालापूर पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये यानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगङ जिल्हा परिषद यांना पाठविला असून सावरोली ग्रामपंचायतीनंतर तालुक्यात चौक ग्रामपंचायतीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.

चौक ग्रामपंचायतीने 15मार्च 2016ला मान्यता प्राप्त नामांकित कंपनीचे विविध वॅटचे सुमारे तीनशे  एलईड़ी दिवे खरेदिसाठी  ऑनलाइन पद्धतीने निविदा प्रसिद्ध केली होती.त्यानुसार मे.सोर्स वन ल्युमिनिरीज प्रा.लिमिटेड या कंपनीला सदरचे टेंडर मिळाले होते.त्यानुसार 48वॅटचे शंभर एलईड़ी दिवे प्रती नग 3975रूपयाला खरेदि करण्यात आले.व 36वॅटचे दोनशे एलईड़ी दिवे प्रती नग 3150 रूपये दराने खरेदि करण्यात आले.एकूण 10,27500रूपये किंमतीच्या मालाची खरेदि चौक ग्रामपंचायतीने केली होती.
या खरेदि प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामपंचायतीच्या सदस्या सुषमा गावडे यांनी सामाजिक कार्यकर्ते असलेले त्यांचे पती सुरेश गावडे यांच्या निदर्शनास आणल्यानंतर सुरेश गावडे यांनी मे.सोर्स वन ल्युमिनिरीज प्रा.लिमिटेड कड़े  दुकानाच्या नावे 48वॅट व 36वॅट चे एलईड़ी दिवे खरेदि केले असता 48वॅटचा एलईड़ी दिवा प्रती नग 2430रूपये तर 36वॅटचा एलईड़ी दिवा प्रती नग 1470रूपये दराने मिळाला.चौक ग्रामपंचायतीने सदरचा माल सुमारे 4,90500 रूपये जास्त दराने खरेदी केल्याचे सुरेश गावडे यांनी माहिती अधिकारात देखील ऊघड़ केले होते.
सदरचा अवहाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगङ  यांना पाठविला असून त्याबाबत पुढील कारवाईसाठी पाठपुरावा सुरू आहे. (संजय भोये.वरिष्ठ गटविकास अधिकारी खालापूर पंचायत समिती)
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत