चौक रूग्णालयावर उपचार सुरू; आमदार मनोहर भोईर यांचे हस्ते दुरूस्तीचा नारळ फुटला.

खालापूर : मनोज कळमकर

खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रूग्णालयाच्या दुरावस्थेबद्दल वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसात रूगाणालयाच्या दुरूस्तीच्या कामाचा नारळ फूटला असून आजारी रूग्णालय ठणठणीत होणार असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रूग्णालयाचा स्लॅब गळत असल्यामुळे केवळ दहा वर्षापूर्वी बांधलेल्या रूग्णालयाच्या इमारतींची निकृष्ठ कामामुळे दुरावस्था झाली होती. स्लॅब गळती नंतर दोन वर्षांपूर्वी पञ्याची शेड़चे करण्यात आले होते परंतु ठेकेदाराने कामात निष्काळजीपणा केल्यामुळे स्लॅब गळती सुरूच होती.रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी फंङ आला होता परंतु मुहर्त न मिळाल्याने काम मार्गी लागत नव्हते.स्थानिकानी याबाबत आवाज उठविल्यानंतर सोमवारी उरणचे आमदार मनोहर भोईर यांचे हस्ते दुरूस्तीच्या कामाचा नारळ अखेर फुटला.

जिल्हा नियोजन फंङातून सुमारेे बावीस लाख सदुसष्ठ हजाराचा निधी चौक रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी उपलब्ध झाला आहे.रूग्णालय नव्याने सुसज्ज रूपात ऊभे राहणार असून यासाठी स्वतः या कामावर देखरेख ठेवणार असून कामाचा दर्जा योग्य ठेवा अशा सूचना संबधित ठेकेदाराना देण्यात आल्या आहेत.

मोतीराम ठोंबरे-जिल्हा परिषद सदस्य चौक विभाग 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत