चौल चुनकोळीवाडा येथे पुरातत्व खात्याचा दगड उखडला; पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष         

मुरुड : अमूलकुमार जैन

अलिबाग तालुक्यातील चौल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे चौल चुने कोळीवाडा येथे रस्तालगत असणारा पुरातत्व विभागाचा दगड उखडून कचऱ्यात फेकण्यात आला आहे.मात्र या घटनेकडे पुरातत्व विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा चौल हे पुरातन काळापासून प्रसिद्ध असे शहर आहे.या ठिकाणी आगरकोट किल्ला आहे.चौल रेवदंडा परिसरात अनेक ठिकाणी पुरातन काली अवशेष असल्याकारणाने पुरातत्व विभागाने ज्या ज्या ठिकाणी असे अवशेष आहे त्यात्या ठिकाणी दगडी फलक बसविले आहेत.आणि त्यावर लिहिण्यात आले आहे की सदर फलकापासून 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे.

रेवदंडा बाह्यवळण रस्त्यावरून चौल चुने कोळीवाडा या रस्त्याने शितलादेवी,आग्राव येथे जाणाऱ्या रस्ता आहे.चौल चुने कोळीवाडा येथील गणेश मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ठिकाणी पुरातत्व विभागाने अशाच प्रकारचा एक दगड बसविला होता.मात्र गेल्या दोन महिन्यात हा दगड दोन वेळा उखडून रस्त्यालगत टाकण्यात आलेला आहे.

 

मात्र याबाबत अलिबाग येथील पुरातत्व विभागाचे अधिकारी विजय चव्हाण यांना सांगितले मात्र त्यांनी उत्तर दिले की आम्ही काय करणार ? या वरूनच लक्षात येते की पुरातत्व अधिकारी यांची नेमणूक पुरातन काळापासून असलेल्या अवशेषांची जोपासना करण्यासाठी आहे.मात्र ते त्यातून अंग झटकून मोकळे होताना दिसत आहे.

चौल चुने कोळीवाडा येथील दगड कोणी उखडला आहे हे आम्हास माहीत नाही.दगड उखडला जात असेल तर आम्ही बसविण्याचे काम करू. मात्र अज्ञात व्यक्तिविरुद्ध तक्रार देऊन काय उपयोग?  

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत