छत्तीसगडच्या सुकामामध्ये चकमकीत १४ नक्षलवादी ठार

छत्तीसगड : रायगड माझा वृत्त 

छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरू असलेल्या चकमकीत १४ माओवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. माओवाद्यांकडून १६ मोठी शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. कोंता आणि गोलापल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये हा परिसर येतो. या परिसरात 14 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना मोठं यश आलं आहे. सुकमा जिल्हयात किष्टारम भागातल्या जंगलात ही चकमक झाली आहे. पोलीस अधीक्षक अभिषेक मीणा यांनी नक्षलवाद्यांना मारल्याच्या घटनेची पुष्टी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलापल्ली आणि कॉन्टा पोलीस ठाण्यातील सुमारे 100 नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती. माहिती अधिकाऱ्यांच्या माहितीनंतर सुरक्षा दलांनी एक रणनीती आखली आणि माओवाद्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 14 माओवाद्यांचा खात्मा करण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आलं आहे. याबद्दल अजुनही सर्चिंग आपरेशन सुरू आहे.

हाती लागलेल्या माहितीनुसार, 4 आयईडी आणि 16 शस्त्रे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगढमध्ये या वर्षाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. संयुक्त कार्यवाही केल्यानंतर डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफने ही संयुक्त कारवाई केली आहे.

दरम्यान एप्रिल महिन्यातही गडचिरोली जिल्हयाच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या जंगलात एक चकमक झाली होती. या चकमकीतही 6 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. भोपालपल्ली जिल्ह्याच्या अन्नारम ते वेंकटापुरम दरम्यानची ही घटना घडली होती. तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रेहाऊंडसच्या जवानांनी ही कारवाई केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत