छत्तीसगढमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

बिजापूर : रायगड माझा वृत्त 

Related image

छत्तीसगढमधील बिजापूर या नक्षलग्रस्त भागात जवान व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जवानांनी 11 रायफल जप्त केल्या आहेत. विशेष कृती दल व जिल्हा राखीव दलाने केलेल्या कारवाईत या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे बिजापूरचे पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी सांगितले.

दरम्यान, नक्षवाद्यांविरोधात सरकारने नरमाईची भूमिका घेणार नाही असे आधीच स्पष्ट केले आहे. तसेच नक्षलवादी भागांमध्ये गस्त कायम ठेवण्यात आली आहे. नक्षवाद्यांच्या हल्ल्यानंतर देखील जवानांचे ऑपरेशन थांबवण्यात आलेले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत