छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झालेल्यांचे दारिद्र्य कायमचे संपले

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जो नतमस्तक झाला, त्याचे दारिद्र्यपण कायमचे संपल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि व्याख्याते अमोल मिटकरी यांनी रविवारी किल्ले रायगडवर बोलताना केले.
अखिल भारतीय शाक्त शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने किल्ले रायगडवर रविवारी छत्रपती शिवरायांच्या शाक्त राज्याभिषेक दिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्र माला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, पीएनपी शिक्षण संस्थेच्या संचालक चित्रलेखा पाटील, सौरभ खेडेकर, सुधीर भोसले, सुदर्शन तारक आदि मान्यवर या कार्यक्र माला उपस्थित होते. कार्यक्र माचे अध्यक्षस्थान अर्जुन तणपुरे यांनी भूषविले. या कार्यक्र मात रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे आणि चित्रलेखा पाटील यांचा हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे खºया अर्थाने रयतेचे राजे होते. ही भूमी परशुरामाची नाही तर शिवप्रभूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही तांत्रिक अथवा वैदिकतेचे समर्थन केले नाही. बुवाबाजी, रामरहिमसारखी प्रकरणे यावर मिटकरी यांनी कडक शब्दांमध्ये हल्ला चढविला.आज शिवाजी महाराज असते तर रामरहिमचे हातपाय तोडून त्याचा गडावरून कडेलोट केला असता.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये, लहान वयामध्ये हिरकणी पुरस्कार मिळाल्याने भविष्यात आपली जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे सांगितले. राजकीय वारसा आणि वडिलांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. माता ही राजमातांसारखी आणि पुत्र हा शिवाजीराजांसारखा असावा. त्याचप्रमाणे राजमातांच्या विचारांचेही अनुकरण करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. हिरकणी पुरस्काराने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर आगामी काळात रायगडमधील जनता आणि महिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात अर्जुन तनपुरे यांनी छ. शिवाजी महाराज हे क्र ांतिकारी राजे होते असे सांगत, त्यांनी एका ध्येयाने प्रेरित होऊन स्वराज्याची स्थापना केल्याचे सांगितले.

पीएनपीच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी समाजामध्ये आजही पूर्ण समानता आलेली नसल्याची खंत व्यक्त केली. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आज महिला सक्षमपणे विविध क्षेत्रात पुढे आल्या आहेत असे त्या म्हणाल्या. महिलांचे उच्चशिक्षण आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकारांबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत ही त्यांनी यावेळेस व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव सौरभ खेडेकर यांनी आपल्या भाषणात शाक्त राज्याभिषेक सोहळ्याचे वर्तमान स्थितीतील महत्व विषद केले. सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आलेला आजचा हा कार्यक्र म भविष्यात अधिक व्यापक प्रमाणावर करण्याचा मनोदय व्यक्त के ला.
प्रारंभी मेघडंबरी येथे छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊंचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात आली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांच्यासह इतर समविचारी कक्ष, संघटना यांनी या कार्यक्र माचे आयोजन केले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत