छातीत दुखत असल्यामुळे छगन भुजबळ यांना रुग्णालयात केलं दाखल

मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह ३५ आरोपींना दिलासा दिला आहे.

 

नाशिक, 06 ऑगस्ट : मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह ३५ आरोपींना दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या प्रकरणी ६ सप्टेंबरपर्यंत भुजबळ यांच्यासह इतर आरोपींना वैयक्तिक हमीवर अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे. ६ सप्टेंबरला कोर्ट आपला निकाल देणार आहे. दरम्यान, छगन भुजबळांना जसलोक हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. छातीत दुखत असल्यानं त्यांचना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

भुजबळ यांची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्याच्या आधारे ईडीनं पीएमएलए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करता येणार की नाही याविषयी पीएमएलए कोर्ट ६ सप्टेंबरला आपला निर्णय देणार आहे.

याआधीही 27 जूनला झालेल्या सुनावणीत ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या प्रकरणी ईडीनं वैयक्तिक हमीवर भुजबळ यांना ६ ऑगस्टपर्यंत दिलासा दिला होता. यावर आज कोर्टाने पुन्हा भुजबळ 6 संप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत