जंजिरा किल्ल्यावर रविवारपासून कायमस्वरूपी तिरंगा !

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिलेल्या परवानगीनंतर, अखेर मुरूड येथील जंजिरा किल्ल्यावर रविवारपासून कायमस्वरूपी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.

मुंबई : रायगड माझा वृत्त 

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिलेल्या परवानगीनंतर, अखेर मुरूड येथील जंजिरा किल्ल्यावर रविवारपासून कायमस्वरूपी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. त्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठानने ढोल-ताशांच्या गजरात शाही सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांसह विविध ऐतिहासिक घराण्यांचे वंशज आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे प्रमुख गणेश रघुवीर यांनी सांगितले की, या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज युवराज संभाजी राजे छत्रपती, सरलेख कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे वंशज श्रीमंत सरदार सत्येंद्र राजे दाभाडे सरकार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत