जगातील पहिला फिजेट स्पिनर मोबाइल भारतात दाखल, किंमत फक्त 1200 रुपये

मुंबई : चिली इंटरनॅशनल होल्डिंग (एचके) लिमिटेडने भारतीय बाजारपेठेमध्ये जगातील पहिला फिजेट स्पिनर मोबाइल भारतामध्ये आणला आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये असणार आहे. K188, F05 व एजीपीएस असलेले फोन दाखल झाले आहेत. चिली मोबाइल्सचा F05 हा ए-जीपीएस तंत्रज्ञान असलेला भारतातील पहिला फिचर फोन आहे. ब्रॅण्ड चिली मोबाइल्स अंतर्गत हे दोन्ही नाविन्यपूर्ण उत्पादने भारतात ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉपक्लूजवर ऑनलाइन, तसेच कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडे पेटीएमच्या माध्यमातून आणि भारतभरातील सर्व प्रमुख स्टोअर्समध्ये ऑफलाइन नेटवर्क्सच्या माध्यमातून सप्टेंबर 2017 अखेरपर्यंत उपलब्ध असेल.

चिली इंटरनॅशनल होल्डिंग (एचके) लिमिटेडचे भारतातील विक्रीचे प्रमुख, मायकेल फेंग म्हणाले,  भारतातील दाखलीकरणासह आमचा मार्केट शेअर वाढवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असण्यासोबतच सेल फोन्ससाठी जलदगतीने विकसित होत असलेला देश सुद्धा आहे. या नवीन मॉडेल्सच्या ऑनलाइन प्रीव्ह्यूसह ग्राहकांकडून मॉडेल्सना उच्च मागणी मिळाली आहे. तिमाहीमधील आमचा फोकस भारतातील आमच्या ब्रॅण्डची उपस्थिती प्रबळ करण्यावर आहे. K188 व F05 सह आम्ही किफातशीर दरातील सर्वोत्तम उत्पादने दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत.’’

१२०० रुपयांपासून १३०० रुपयांपर्यंत किंमत असलेला स्पिनर मोबाइल, K188 खिशाला परवडणारा आहे. हे कॉम्पॅक्ट गॅझेट मोबाइल फोनच्या सर्व मूलभूत गरजांची पूर्तता करते, तसेच आजच्या व्यस्त जीवनामधील तणाव दूर करण्यामध्ये मदत करेल. हे गॅझेट फिजेट स्पिनर, तसेच तुमच्या स्मार्टफोनसाठी ब्ल्यूटूथ डिवाईस म्हणून सुद्धा वापरता येऊ शकेल. हा फिजेट स्पिन, फिचर फोन व ब्ल्यूटूथ हेडसेटचा संयोजन असलेला फोन आहे. या फोनमध्ये इमेजेस्, व्हिडिओ व म्युझिक सारखे मल्टीमीडिया पर्याय, तसेच युजर्सच्या नेटवर्कनुसार इंटरनेट सुविधा समाविष्ट आहे. उत्पादन भारतात ऑनलाइन व ऑफलाइन स्टोअर्समध्ये रोज गोल्ड, गोल्ड, सिल्व्हर, ब्लॅक, ब्ल्यू व रेड अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत