जगात फेसबुकच अव्वल; व्हॉटस् अ‍ॅप चौथ्या क्रमांकावर

न्यूयॉर्क : रायगड माझा ऑनलाईन 

डेटा लिक आणि यूजर्सच्या प्रायव्हसीबाबतचे अनेक आरोप झाल्यानंतरही फेसबुकच जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठरलेले आहे. रिसर्च फर्म ग्लोबल वेब इंडेक्सने सोशल मीडिया ट्रेंडस्वर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जगभरात जितके लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहेत त्यापैकी 85 टक्के फेसबुकवर आहेत. याबाबतीत व्हॉटस् अ‍ॅप चौथ्या स्थानावर आहे.

फेसबुकवरील यूजर्सची संख्या मोठी असली तरी रोज त्याचा वापर करणारे 79 टक्के आहेत. याबाबतीत दुसर्‍या स्थानावर यू ट्यूब आहे. सोशल मीडियातील एकूण युजर्सपैकी यू ट्यूबवर 79 टक्के आहेत. 86 टक्के लोक केवळ व्हिडीओ पाहण्यासाठीच यू ट्यूबचा वापर करतात. ग्लोबल वेब इंडेक्सनुसार फेसबुक मेसेंजरचे 72 टक्के मेंबर्स आहेत. मात्र, यापैकी केवळ 55 टक्के लोकच त्याचा वापर करतात. या यादीत व्हॉटस् अ‍ॅप चौथ्या स्थानावर आहे. व्हॉटस् अ‍ॅपचे सोशल मीडियातील एकूण यूजर्सपैकी 66 टक्के मेंबर्स आहेत. 63 टक्के मेंबर्ससह इन्स्टाग्राम पाचव्या स्थानावर आहे. जगभरातील लोक रोज सरासरी 2 तास 22 मिनिटे वेळ सोशल मीडिया आणि मेसेजिंगवर घालवतात. फिलिपीन्समधील लोक यासाठी सर्वाधिक वेळ देतात. तिथे लोक सरासरी 4 तास 11 मिनिटे सोशल मीडियासाठी खर्च करतात. या बाबतीत भारतीय 13 व्या स्थानावर आहेत. 2017 मध्ये सोशल मीडियासाठी भारतीय लोक सरासरी 2 तास 25 मिनिटे देत असत. 2018 मध्ये ही वेळ पाच मिनिटांनी वाढून अडीच तासांची झाली. जपानमधील लोक केवळ 39 मिनिटे यासाठी देतात!

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत