जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांची घोड्यावरून मिरवणूक

रायगड माझा वृत्त 

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाकडून होणाऱ्या भव्य सत्काराला नम्र पणे नकार दिला असताना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असलेल्या पंकजा मुंडेंनी मात्र मोठ्या जल्लोषात हा सत्कार स्वीकारला. त्यांची रुबाबदार घोड्यावरून काढण्यात आलेली मिरवणूक या सत्काराचे वैशिष्ट्य ठरले. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याबद्दल परळी मतदारसंघातील मराठा समाजाने  भव्य सोहळा आयोजित केला होता, या सोहळ्यापूर्वी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नटराज रंगमंदिरा पर्यंत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी पंकजा मुंडे यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून आणि शिवरायांची भव्य प्रतिमा तसेच तलवार देऊन सत्कार करण्यात आला. मराठा समाजाची आरक्षणाची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती, तत्कालीन सत्ताधा-यांनी ही मागणी संवेदनशीलपणे हाताळली नसल्याने सनदशीर मार्गाने समाजाने आंदोलन केले, त्यांची ही मागणी मान्य करत भाजप सरकारने कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून दिले असे पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. पंकजा मुंडे या त्यांच्या आक्रमक राजकारणासाठी परिचित आहेत. त्यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा कधीच लपून राहिली नाही. आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे मराठा आरक्षणा नंतर हे तर आपले कर्तव्य होते असे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भव्य सत्कारास नकार दिला असताना पंकजा मुंडेंनी स्वीकारलेला भव्य सत्कार आणि त्यानिमित्त काढण्यात आलेली घोडयावरून मिरवणूक हा चर्चेचा विषय ठरली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत