जनतेने विश्वास टाकला पण सरकारने केला जनतेचा विश्वासघात

अलिबाग मुरूड : अमूलकुमार जैन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेला भुलथापा दिल्या. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला पण या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.असे प्रतिपादन अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी मुरूड तालुक्यातील काजूवाडी ग्रामस्थ यांनी केलेल्या सत्कारप्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर मुरूड पंचायत समितीच्या सभापती नीता घाटवळ,भोईघर सरपंच काशिनाथ वाघमारे, उपसरपंच ज्योती वणे, माजी सरपंच निलेश घाटवळ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राम बंदरी,मुरूड तालुका कृषी बाजार समितीचे माजी अध्यक्ष चक्रधर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुरूड तालुका हा विकासाच्या बाबतीत पिछाडीवर होता. या तालुक्यात वीस वर्षे सेनेचा आमदार होता मात्र त्यांना विकास करता आला नाही.मात्र मुरूड तालुक्याचा खरा विकास हा अलिबाग तालुक्याला जोडल्यानंतर झाला आहे.या तालुक्याच्या विकासास खरी चालना ही मीनाक्षी पाटील हे आमदार झाल्यानंतरच मिळाली आहे. ज्यांना स्वतःच्या ग्राम पंचायत मध्ये विकास कामासाठी निधी आणता येत नाही.ते शेतकरी कामगार पक्षाच्या पंचयातमध्ये काय आणतील?.काशीद येथील जेट्टी साठी आमदार जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला म्हणून जेट्टी मंजूर झाली आहे.विरोधक मात्र कोणतेही विकासकामे आणली तर आम्ही आणली असे म्हणत दिंडोरा पिटत फिरतात.मात्र त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार विधाने करावी .कारण या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी विधिमंडळात प्रतिनिधित्व करीत आहे.कोणतीही योजना आणायची असेल तर माझे पत्र आवश्यक आहे.सहा वेळा खासदारकी भूषवलेल्या गीते यांनी किती लोकांना रोजगार दिला किंवा आपण ज्या खात्याचे मंत्री आहेत किती औद्योगिक कारखाने आणलेत याची जनतेला माहिती द्यावी.निलेश घाटवळ यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात असणाऱ्या सेनेच्या उमेदवाराचे काम केले होते.माझ्या विरोधात निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी निवडणुकीनंतर कितीवेळा आले त्यांनी किती विकासकामे केली आहे याची माहिती जनतेला द्यावी.बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एका खासगी गोयंका नामक व्यक्तीच्या कंपनीच्या माध्यमातून सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे धरणाच्या कामासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शेकापक्षाची बांधिलकी ही जनतेशी आहे.समुद्र किनारी जवळ पास दोनशे कोटीचे बंधारे हे पर्यावरण मंत्रालयाची परवानगी न मिळाल्याने रखडले आहे.पर्यावरण खाते हे शिवसेनेकडे असून त्याचे मंत्री रामदास कदम हे कोकणातच आहेत.शिवसेनेचे खासदार अनंत गीते हे दोन वेळा शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीने खासदार झाले आहेत. गेल्या निवडणूकमध्ये आम्ही आमचा उमेदवार उभा केला नसता तर तटकरे हे एक लाखाहून अधिक मताने निवडून आले असते.आता तर शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी ची आघाडी आहे.आमच्या विरोधात कितीही आघाड्या झाल्या तरी आमचे कोणीही काही बिघडवू शकणार नाही.अलिबाग मध्ये रेल्वेयेईल अशी घोषणा गेल्या दहा वर्षांपासून होत आहे.मात्र ती रेल्वे कधी येईल हे माहीत नाही.पण आमच्या आघाडीचे उमेदवार तटकरे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर रेल्वे अलिबाग मध्ये येणार काळ्या दगडावरची रेघ आहे.निवडणुका जवळ आल्या की भाजप वाल्याना राम मंदिराची आठवण येते.आणि त्या मुद्यावर निवडणुक लढविल्या जातात.बारशिव भोईघर काजूवाडी या रस्त्यासाठी माजी सभापती बाबू नागावकर, निलेश घाटवळ, राम बंदरी,आणि चक्रधर ठाकूर यांनी पाठपुरावा केला आहे असेही यावेळी सांगितले.राज्यातील भाजपाचे सरकार सर्वच आघांडय़ावर अपयशी ठरले आहे.शेतकरी, व्यापारी, कामगार, छोटे व्यवसायीक व औद्योगीक क्षेत्राची या शासनाच्या धोरणामुळे मोठी पिछेहाट झाली आहे.खोटी आश्वासने व भुलभुलैया करीत देशात भाजपचे सरकार आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेला भुलथापा दिल्या. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला पण या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. कोणतेही विकासाचे काम केले नाही मात्र जाहिरातबाजी करायला सरकार पटाईत आहे अशी टिकाही यावेळी केली.बेकारीही वाढली.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारला ना शेतकऱयांचे दुखणे माहित आहे ना सामान्यांचे प्रश्न माहित आहेत केवळ जनतेची फसवणूक करणे हा एकमेव उद्योग भाजपाचा असून या सरकार विरोधात आता जनतेने रस्त्यावर उतरावे लागले आहे.पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन ही आमदार पंडित पाटील यांनी केले आहे.

मुरूड तालुक्याचा खरा विकास केला असेल तर शेतकरी कामगार पक्षाने. बारशिव ते भोईघर रस्त्यासाठी जवळ पास अडीच कोटींचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून फक्त शेतकरी कामगार पक्षाचे नेतेच आणू शकतात. आमच्या पक्ष हा सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन विकासासाठी झटत आहे.विरोधकांनी कोणती विकासकामे केली आहे आणि ती दाखवा आणि बक्षीस मिळवा असे आव्हान यावेळी निलेश घाटवळ यांनी केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत