जनतेशी बांधिलकी नसून स्वतःचा विकास खूप महत्वाचा; रवींद्र चव्हाण यांचा तटकरेंवर हल्लाबोल

 

मुरूड (अलिबाग) : अमूलकुमार जैन

सुनील तटकरे यांना जनतेशी बांधिलकी नसून स्वतःचा विकास खूप महत्वाचा वाटतो. तेव्हा स्वार्थी राजकारण्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या. गीते हेच हे योग्य खासदार असून त्यांनाच दिल्लीत पाठवण्याचे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोर्ली येथील प्रचार सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे विधान सभा अध्यक्ष महेश मोहिते, कोळी महासंघाचे चेतन पाटील,जिल्हा परिषदेच्या सदस्यां राजश्री मिसाळ, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, मुरुड तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते, बोर्ली सरपंच नौशाद दळवी,चेहेर सरपंच सुवर्णा चवरकर, दर्शन प्रभू, शिवसेना तालुका अध्यक्ष ऋषिकांत डोंगरीकर, शिवसेच्या उसरोली जिल्हा परिषदेच्या महिला संघटिका जगीता कोटकर आदी उपस्थित होते.

देशात घातपात करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचे खटले भरले जाणार नाही, असा जाहीरनामा करणाऱ्या काँग्रेसला मत देणार का, असा सवाल करून लोकांना आपण मतदान करणार का, असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला.रायगडमध्ये युतीचेच खासदार अनंत गीते हेच पुन्हा निवडून येणार, आहेत.तटकरेसारखा भ्रष्टाचारी व्यक्ती जिल्ह्याने दिली असून 72 हजार कोटींचा भ्रष्टाचार तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी व्यक्तीला निवडून का द्यायचे असा सवाल केला. रायगड लोकसभा मतदार संघात पुन्हा युतीचे उमेदवार अनंत गीते हेच खासदार म्हणून निवडून येणार आहेत. युतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशात व राज्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्ग, रायगड किल्ला संवर्धन, जेएनपीटीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, बंदरे, पोर्ट मच्छीमारांचा प्रश्न या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यात राहणारा प्रत्येक नागरिक देशाच्या हितासाठी व देशावर प्रेम करणारा हा धनुष्यबाणावरच मतदान करेल यात शंका नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदारकीचे उमेदवार अनंत गीते यांच्या अखंड राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर कोणताही आरोप झालेला नाही. निष्कलंक म्हणून त्यांच्याकडे मतदारसंघात आदराने पाहिले जाते. परंतु त्यांच्याविरुद्ध उभे असलेले उमेदवार हे भ्रष्ट असून, त्यांची कारकीर्द कशी गाजेल, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असून शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.कोकणात समुद्र फार अथांग आहे.मासेमारी करीत असताना हा उद्योग कधी अडचणीत येईल हे सांगता येणार नाही म्हणून मत्स्यशेती यशस्वी होऊन निलक्रांती होण्याकरीता मत्स्य विकासात अद्यावत संशोधन होणे गरजेचे आहे.पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटूंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सुध्दा विद्यमान सरकारने घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेच्या पायरीवर नतमस्तक होऊन सांगितले होते की मी या गरीब देशाचा मी पंतप्रधान होत आहे मात्र मी सरकार हे जनसेवक म्हणून चालविणार आहे.त्यांनी उज्जवला गॅस योजना सारख्या अनेक लोक हितोपयोगी योजना आणल्या आहेत.असे चव्हाण यांनी सांगितले.

कोळी महासंघाचे चेतन पाटील यांनी सांगितले की,देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक सरकार कार्य करीत आहेत.हे सरकार कोळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.या सरकारने थेरोंडा येथे 42 कोटींची जेट्टी उभरण्यासाठी निधी दिला आहे.विरोधी उमेदवार यांनी मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार केला आहे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.या मतदारसंघात44कोळीवाडे आहेत.आमदार रमेश पाटील यांनी आदेश दिलेत की शिवसेनेचा वाघ , अनंत गीते यांचे काम करून त्यांना विजयी करा अन त्यांना दिल्लीत पाठवून देऊ नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान करण्यासाठी.छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोळी समाजाच्या जीवावरच समुद्रात आरमार उभे केले होते.असे पाटील यांनी सांगितले.

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. झालेल्या अन्यायाचा वचपा काढण्याची ही नामी संधी असून कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन ना.अनंत गीते यांना विजयी करणे आवश्यक आहे. सुनील तटकरे यांनी कधीही कार्यकर्त्यांना मोठे केले नाही. जनतेशी बांधिलकी नसून स्वतःचा विकास खूप महत्वाचा वाटतो. तेव्हा स्वार्थी राजकारण्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या. गीते हेच हे योग्य खासदार असून त्यांनाच दिल्लीत पाठवण्याचे आवाहन दळवी केले.यंदाच्या या निवडणुकीत प्रत्येक मत खूप महत्वाचे आहे.साठी कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजप सरकारने केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवावी. आरोप असलेला नेता व आरोप नसलेला नेता यामध्ये लोकांनी फरक जाणून घ्यावा, असे आवाहन बोर्ली सरपंच नौशाद दळवी यांनी केले.

यावेळी चंद्रकांत मोहिते,सुनील नाईक,उस्मान रोहेकर यांनीसुद्धा सभेस संबोधले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची मेळाव्यास हजेरी होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत