जपानमध्ये मूल जन्मले कि सरकार देते १ लाख ८५ हजार रु.

 

रायगड माझा वृत्त 

घटता जन्मदर ही आधुनिक आणि संपन्न जपानची सध्याची सर्वात मोठी समस्या बनली असून जन्मदर वाढावा म्हणून सरकार जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलामागे पालकांना १ लाख ८५ हजार रु. प्रोत्साहन भत्ता देत आहे. २००९ मध्ये जपानची लोकसंख्या १२ कोटी ८५ लाख होती ती आता १२ कोटी ७१ लाखावर आली असून पुढच्या १० वर्षात ती १/३ घटेल असा अंदाज आहे. २०१६ सालात जपान मध्ये ९ लाख मुले जन्माला आली तर मृत्यूचा दर ३ लाखांनी वाढला. यामुळे जन्मदर वाढवा यासाठी सरकार प्रयत्नशील असून देशाच्या बजेट मध्ये प्रोत्साहन भत्त्यासाठी वेगळी तरतूद केली गेली आहे.

जपान मध्ये मुलाच्या देखभालीचा खर्च महिना १ हजार आहे. या खर्चावर सरकार सबसिडी देते. माध्यमिक शाळेत मूल गेले कि बस, व्हॅनच्या खर्चापोटी ६१ हजार रु. देते. आरोग्य, उपचारासाठी येणाऱ्या खर्चातील ३० टक्के रक्कम सरकार देते. नर्सरी, पाळणाघरे चालविणाऱ्यारयाना भाडे न आकारता जमीन देते. तरीही येथील जन्म दर घटतो आहे.

यामागे अनेक कारणे सांगितली जातात. तरुण मुले मुली करिअरकडे अधिक लक्ष देतात त्यामुळे लग्न करण्याचा विचार दूर ठेवतात किंवा उशिरा लग्न करतात. महिलांना जपानमध्ये अधिक करियर संधी आहेत. लग्न झाले कि महिलांना घरातील कामाचा बराचसा भाग उचलावा लागतो त्यामुळे मुली लग्न करत नाहीत. समजा लग्न केले तर अपत्य जन्माचा विचार केला जात नाही. जपानमध्ये ६५ वर्षांवरील लोक्संख्येचे प्रमाण २७ टक्के आहे त्यामुळे मृत्युदर अधिक आहे. तसेच जपानमध्ये तरुणात व्यवसाय संधीसाठी देश सोडून परदेशी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून दर मिनिटाला १ व्यक्ती देश सोडून अमेरिका, युरोप मध्ये जाते असे आकडेवारी सांगते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत