जपानला भूकंपाचा धक्का; ८ जणांचा मृत्यू

जपान : रायगड माझा वृत्त

विध्वंसक वादळानंतर जपानला आज पहाटे शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची रिश्टर स्केलवर ६.६ इतकी नोंद झाली आहे. जपानच्या उत्तरेकडील होक्काइडो बेटावर झालेल्या या भूकंपात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक घरे कोसळली आहे. तर भूस्खलनामुळे अनेक लोक बेपत्ता झाले असल्याचे वृत्त आहे.

ज्या ठिकाणी भूकंपामुळे नुकसान झाले आहे; त्या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू आहे. भूकंपामुळे थर्मल प्लांटचे नुकसान झाल्याने सुमारे ३० लाख लोकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जपानच्या पश्चिम भागाला विध्वंसक चक्रीवादळाचा (टायफून) तडाखा बसला होता. यामुळे मोठी पडझड झाली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत