जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

पंढरपूर : रायगड माझा

जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीचे दोन बडे नेते अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीचे माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी याप्रकरणी माढा न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

या प्रकरणात बबनराव शिंदे यांचा मुलगा रणजित शिंदे याचा देखील समावेश आहे. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत