जम्मू-कश्मीरमध्ये हिंदुस्थानच्या झेंड्याचे नामोनिशान शिल्लक राहणार नाही,आमदाराची धमकी

 

 श्रीनगर : रायगड माझा वृत्त 

जम्मू-कश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद राणा यांनी तिरंग्याचा अपमान करून सरळसरळ धमकी दिली आहे. ‘संविधानाच्या अनुच्छेद ३५ (अ) मध्ये बदल केल्यास आणि कलम ३७० हटवल्यास जम्मू-कश्मीरमध्ये तिरंगा फडकताना दिसणार नाही. जम्मू-कश्मीरमध्ये हिंदुस्थानच्या झेंड्याचे नामोनिशान शिल्लक राहणार नाही’, अशी धमकी राणा यांनी दिली आहे. जम्मू-कश्मीरमधील छूगा गावातील सभेमध्ये बोलताना राणा यांनी ही धमकी दिली आहे

‘जम्मू-कश्मीरमधील सर्व लोकांना कलम ३७० च्या रक्षणासाठी पुढे यावे लागेल. या कलमामुळेच येथील लोकांना नोकरी, रोजगार मिळत आहे. कलम ३७० मुळेच येथील लोकांना विशेषाधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यांची संपत्ती वाचली आहे. जर हे कलमच काढून टाकले तर सर्व नष्ट होईल. श्रीमंत लोक येथे येऊन दमदाटी करून सर्व जमिन खरेदी करतील. याच कलमामुळे जम्मू-कश्मीर हिंदुस्थानसोबत टिकून आहे. कलम ३७० हटवल्यास हिंदुस्थानसोबतचे संबंध संपुष्टात येईल. हिंदुस्थानचाच संबंध राहिला नाही तर त्यांचा तिंरगा कसा फडकेल. त्या झेंड्याचे येथे काही काम राहणार नाही’, अशी गरळ राणा यांनी ओकली.

यापूर्वी जम्मू-कश्मीरमधील जनतेला हिंदुस्थानच्या संविधानाच्या अनुच्छेद ३५ (अ) नुसार मिळालेल्या विशेषाधिकारामध्ये बदल अथवा छेडछाड केल्यास कश्मीरमध्ये तिरंगा फडकावणारा कुणीही राहणार नाही, असा इशारा जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला होता.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत