जम्मू काश्मिरात चार दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार

दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग

काश्मीर : रायगड माझा वृत्त 

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरु ठेवली असून चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती.  अनंतनाग येथील श्रीगुफवारा येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. पहाटे तीन ते चार दहशतवादी याठिकाणी लपले असल्यची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्यांना घेरलं होतं. दरम्यान चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे.

जम्मू काश्मीरचे डीजीपी एस पी वैद्य यांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, ‘पहाटे ही चकमक सुरु झाली होती. त्यावेळी तीन ते चार दहशतवादी परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली होती. तिनही दहशतवाद्यांचा मृतदेह हाती लागला आहे. चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला असून दोन नागरिक जखमी झाले आहेत’.

संग्रहित छायाचित्र
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत