जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि आयएसआयचे झेंडे फडकवत दगडफेक, भारतविरोधी घोषणाबाजी

श्रीनगर : रायगड माझा वृत्त 

जम्मू-काश्मीरमध्ये आज बकरी ईदच्या दिवशी अनेक भागात रस्त्यांवर निदर्शने केली जात आहे. श्रीनगरच्या मुख्य चौकात पाकिस्तान आणि आयएसआयचे झेंडे फडकवत दगडफेक करण्यात आली आणि भारतविरोधी घोषणाही दिल्या गेल्या.

कुलगाममध्ये मशीदीबाहेर जिथे एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होतं, तिथेच एक पोलीसही शहीद झाल्याचे वृत्त आहे. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरही सोडला. दरम्यान, पुलवामात मध्यरात्री दोन वाजता दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्ते शब्बीर भट यांच्या घरी घुसून त्यांना गोळी घालून ठार केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत