जम्मू-काश्मीरमध्ये मेजरसह चार जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करताना एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी एलओसी (नियंत्रण रेषा) पार करुन घुसखोरी करणार असल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली होती.

माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवान सतर्क झाले. त्यानंतर अचानक गोळीबार सुरु झाला. बराच वेळ चाललेल्या या गोळीबारात मेजरसह चार जवान शहीद झाले. घटनास्थळाहून दोन दहशतवाद्यांचे मृतदेहही ताब्यात घेण्यात आले आहेत, तर शोधकार्य अजूनही सुरु आहे.

आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोधकार्य सुरुच आहे. मात्र यावर भारतीय सैन्याकडून अधिकृत माहिती येणं बाकी आहे. या जवानांची नावं आणि इतर माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत