जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेस बादलीजवळ चोरट्यांनी लुटली

दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेस

रेल्वेमार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीन चारच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. या ट्रेनमध्ये हजर असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांना या लुटीची साधी चाहुलही लागली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.

पहाटे ३च्या सुमारास दुरान्तोने सोनीपत स्टेशन ओलांडले. बादली आऊटरला ट्रेनला हिरवा सिग्नल दाखवण्यात आला होता. पण लुटारूंनी सिग्नल फेल करून लाल सिग्नल दिला आणि भरधाव वेगाने येणारी दुरान्तो रोखली. त्यानंतर ५ ते १० लुटारू बी-३ आणि बी-०७ या डब्यांमध्ये शिरले. प्रवासी आवाज करणार नाहीत याची काळजी लुटारूंनी घेतली. प्रवाशांच्या मानेवर सुरा ठेवून त्यांच्याजवळचा लाखोंचा ऐवज लुटारूंनी हस्तगत केला आणि पळ काढला. अवघ्या २० मिनिटांत हा सगळा प्रकार बेमालूमपणे पार पडला. आजूबाजूच्या डब्यातील लोकांनाही याची कुणकुण लागली नाही.

सुमारे ४च्या सुमारास ट्रेन निघाली आणि ४वाजून २० मिनिटांनी सराय रोहिल्ला स्टेशनला पोहोचली तेव्हा सराय रोहिला स्टेशनवरील पोलिसांकडे याप्रकाराची तक्रार प्रवाशांनी केली. पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत