जयंत पाटील v/s चंद्रकांत पाटील; विधान भवनातील पत्रकार परिषदेत आरोपांची तोफेबाजी

मुंबई : रायगड माझा वृत्त 

बिल्डरला फायदा होण्यासाठी भूखंड प्रकरणात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.हा सर्व प्रकार विधान भवनातील पत्रकार परिषदेत घडल्याने राजकीय धुमश्चक्री सुरू झाली.पुण्यातील मौजे बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी एक भूखंड राखीव होता.हा भूखंड बिल्डरने हडप करून जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला.

चंद्रकांत पाटलांचे आणखी एक पुण्यातलेच दुसरे भूखंडाचे प्रकरण जयंत पत्ळणी उघडकीस आणलं.पुण्यातील हवेली तालुक्यातील मौजे केसनन येथील २३ एकर म्हातोबा देवस्थानची इनामी जमीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल छुगेरा प्रॉपर्टीज लिमिटेड यांना खरेदी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप जयंत पाटीलांनी केला.या व्यवहारात शासनाला मिळणारा नजराणा स्वरुपातील ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा दावाही पाटील यांनी केला. आरोप केल्यानंतर स्वतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर आक्षेप घेतला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत