‘जय मल्हार’ फेम सुरभी हांडे हीचा साखरपुडा

रायगड माझा वृत्त :

‘जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडे  हिचा साखरपुडा जळगाव इथं नुकताच पार पडला. दुर्गेश कुलकर्णी याला तिनं आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलं आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थित त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.

मी आणि दुर्गेश अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहोत. नुकताच आम्ही साखरपुडा केला असून पुढच्या वर्षी लग्न करू,’ असं सुरभीनं म्हटलं आहे. या साखरपुड्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सध्या सुरभीची ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ ही मालिका प्रचंड गाजतेय. तसंच केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगंबाई अरेच्चा २’ या सिनेमातसुध्दा ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत