‘जय मल्‍हार’ फेम देवदत्त नागे याचे बॉलिवूडमध्‍ये पदार्पण

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मराठीच्या खंडोबाची अर्थातच ‘जय मल्‍हार’ फेम देवदत्त नागे आता मोठ्‍या पडद्‍यावर पदार्पण करणार आहे. ‘जय मल्‍हार’ या टीव्‍ही मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला देवदत्त नागे चित्रपटातून बॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री करणार आहे. रिपोर्ट्‍सनुसार, देवदत्त चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात तो ही भूमिका साकारणार आहे. ‘सत्‍यमेव जयते’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्येदेखील देवदत्तची झलकही पाहायला मिळते.

देवदत्त नागे सर्वांचा आवडता कलाकार आहे. त्‍याच्‍या फॅन्‍ससाठी ही आनंदाची बातमी आहे. बलदंड शरीरयष्‍टी असलेला देवदत्तला खलनायकाची देखील भूमिका शोभेल, यात शंकाच नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत