जळगावमध्ये भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल; शिवसेनेला धक्का

जळगाव : रायगड माझा वृत्त 

गेली 35 वर्षे सत्तेत असलेल्या सुरेश जैन गटाला धक्का देत भारतीय जनता पक्षाने (भाजप) जळगाव महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवित सत्तांतर घडवून आणले. महापालिकेच्या 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (शुक्रवार) सुरू आहे. दुपारी 12 पर्यंत सर्व जागांचे कल हाती आले असून 75 पैकी तब्बल 57 जागांवर भाजप आघाडीवर आहे. यामुळे सुरेश जैन आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 

 

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत 14 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. ‘एमआयएम’ने अनपेक्षितरित्या अस्तित्त्व दाखवून देत तीन जागा जिंकल्या. जळगावमध्ये पालिका असल्यापासून आणि 2003 मध्ये महापालिका झाल्यापासून तेथे सुरेश जैन यांचे वर्चस्व होते. जैन यांनी शिवसेना, मग राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास केला; मात्र महापालिकेत त्यांच्याच गटाची सत्ता होती. यंदा मात्र परिवर्तन होईल, असा अंदाज मतदानापूर्वीच बांधला जात होता. जळगावमध्ये भाजपला 38 ते 40 जागा मिळतील, असा राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज होता. गेल्या निवडणुकीत भाजपला 12 जागांवर समाधान मानावे लागले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत