जळगाव भाजपाच्या ताब्यात; सुरेश जैन यांचे वर्चस्व संपुष्ठात!

जळगाव : रायगड माझा वृत्त 

जळगाव महापालिका निवडणुकीत सुरेश जैन आणि शिवसेनेला हादरा बसला असून या निवडणुकीत ७५ जागांपैकी भाजपाने ५७ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले असून सुरेश जैन यांच्यासाठी हा मोठा हादरा असल्याचे मानले जाते.

जळगाव भाजपाच्या ताब्यात; सुरेश जैन यांचे वर्चस्व संपुष्ठात!

 

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी १ ऑगस्टरोजी मतदान झाले होते. या जागांसाठी एकूण ३०३ उमेदवार रिंगणात होते. जळगावमध्ये सुमारे ६० टक्के मतदान झाले होते.  जळगावमध्ये सुरुवातीला शिवसेना- भाजपा युती झाली होती. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चुली मांडत सर्व जागांवर उमेदवार उभे केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही रिंगणात असली तरी खरी लढत शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात होती.

शिवसेनेतर्फे आदेश बांदेकर, संजय सावंत, नीलम गोऱ्हे, पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री दादा भुसे यांनी हजेरी लावली. सुरेश जैन यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मदतीने खिंड लढवली. तर भाजपाकडून गिरीश महाजन आणि शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी धूरा सांभाळली.

शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने बाजी मारली. भाजपाने ५७ जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेना १५ तर एमआयएम पक्षाला ३ जागांवर विजय मिळाला. गेल्या ३५ वर्षांपासून जळगाव महापालिकेवर सुरेश जैन यांचे वर्चस्व असून या पराभवामुळे सुरेश जैन यांना हादरा बसला आहे.

दरम्यान, पराभव मान्य असून आत्मचिंतन करु, अशी प्रतिक्रिया सुरेश जैन यांनी दिली आहे. तर भाजपच्या विकासाच्या मॉडेलला मत मिळाल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत