जागतिक कुस्ती संघटनेचा भारताला झटका

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 


पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारल्यानं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं यापुढे भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता जागतिक कुस्ती संघटनेनं भारताला आणखी एक झटका दिला आहे. त्यांनी इतर राष्ट्रीय संघांना पत्र लिहून भारतीय कुस्ती महासंघासोबतचे सर्व संबंध तोडून टाकावेत, अशा सूचना दिल्या आहेत. यासंबंधी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण आणि सहायक सचिव विनोद तोमर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत