जागतिक टपाल दिन: विज्ञानामुळे लोकांचे आयुष्य सोशल मीडियापुरतेच मर्यादित

बुलढाणा: नितीन कानडजे पाटील

आज आंतरराष्ट्रीय टपाल दिवस आहे. आंतरराष्ट्रीय टपाल दिन 9 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो. मात्र आजच्या युवा पिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटिंगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही. एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही असे.

भगवान पाटील बुलढाणा यांनी सांगितले की, 20 वर्षांपुर्वी जेव्हा शिक्षणासोबत नोकरी लागली तेव्हा आई-वडिलांपासून लांब गेलो होतो. औरंगाबाद येथे असतांना आई-वडिलांना पत्र पाठवण्यास सुरूवात केली. रोजची दिनचर्या लिहून आईला पाठवायचो व त्यांच्या पत्राची वाट पाहायचो. तेव्हा पत्र हे व्यासपीठ होते आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याच परंतु आता सोशाल मिडिया मुळे आपण जे व्यक्त करतो ते आपले नसुन आपल्यावर लादले गेले एक व्यसन असेच म्हणावे लागेल. 20-25 वर्षांपुर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची लाइफ लाइन होते. मागील 20 वर्षांपासून पत्रांचा वापर कमी होत गेला आहे. आज पत्रांची जागा ई-मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे. लोक लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असे, मात्र आज लोक आधुनिक तर होत आहेत, मात्र एकमेंकांपासून लांब जात आहेत. वैज्ञानिक क्रांतीमुळे आज संपुर्ण विश्व एक गाव झाले आहे. वृध्द लोक सांगतात की, जेव्हा एखादे टेलीग्राम यायचे तेव्हा एक संकेत असायचा की, काहीतरी वाईट घडले आहे आणि जेव्हा एखादे पत्र यायचे तेव्हा लोक समजून जायचे की, काहीतरी आनंदाची बातमी आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत