जागतिक पर्यावरण दिनी तरूणांनी केले वृक्षारोपण…

कोदिवले येथील तरूण व नेरळ पोलिस स्थानकाचा संयुक्तिक उपक्रम..

नेरळ : कांता हाबळे 

जागतिक पर्यावरण दिन तसेच कोदिवले येथील युवकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नेरळ पोलिस स्टेशनच्या सहकार्याने पोलिस स्टेशन आवारात वृक्षारोपण करत  हरित संकल्प पुर्णत्वास नेत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

यावेळी वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजक केशव बबन तरे, तंटामुक्ती अध्यक्ष, दहिवली ग्रामपंचायत तसेच नेरळ पोलिस स्थानकचे पोलिस उपनिरिक्षक  ढवळे, शेडगे यांच्यासह भाजपा तालुका अध्यक्ष दिपक बेहेरे, संतोष भोईर, रायगडजिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश कोळी, नितिन कांदळगावकर, प्रज्ञा प्रकोष्ठ संयोजक रायगड जिल्हा, संजय कराळे, कर्जत तालुका चिटणीस, ज्ञानेश्वर भगत, तालुका प्रमुख ओबीसी सेल प्रमुख,  कृणालखेडकर, भाजपा उपजिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा यांच्यासह नेरळ पोलिस स्टेशनचे सर्व पोलिसवर्ग तथा विविध क्षेत्रातील मान्यवर व कोदिवले येथील सर्व तरूण उपस्थित होते.

ग्लोबल वॉंर्मिंगची धोक्याची घंटा, वाढते कॉंक्रिटीकरण, प्रदुषण आदींमुळे निसर्गाच ढासळलेलं संतुलन दिवसेंदिवस ही एक गंभीर समस्या असूनयेणार्‍या  काळात आपल्या सर्वांच्या माध्यमातून हरित क्रांती होणे आवश्यक आहे. आमच्या हरीतसंकल्पाला नेरळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव  यांनी होकार देऊन सहकार्य केले तसेच तरूणांचा संकल्प अतिशय चांगला आहे त्याबद्दल समाधानही व्यक्त केल्याचं कार्यक्रमाचे आयोजक केशव तरे यांनी सांगितले.
यावेळी आंबे, काजू, नारळ, कडूनिंब, चिकू, आवळा, जाम, बदाम आदी प्रकारचे वृक्ष देण्यात आले. हा  क्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सोनावळे, प्रल्हाद राणे, अरविंद तरे, भास्कर तरे, रमेश चहाड, अतिश सोनावळे, पप्पु तरे, महेशतरे, सुभाष सोनावळे, रविंद्र तरे या तरूणांसह नेरळ पोलिस स्थानकाचे पोलिस समीर भोईर, बरगडे आदींचा सहभाग लाभला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत