जागतिक मराठी संमेलन अध्यक्षपदी डॉ. श्रीनिवास ठाणेदार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने 16वे जागतिक मराठी संमेलन येत्या 4, 5 व 6 जानेवारी रोजी नागपूर येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे रहिवासी उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांची निवड करण्यात आली आहे.

अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख पाटील व गिरीश गांधी, कोषाध्यक्ष उदय लाड व आयोजन समितीचे शहर समन्वयक शशिकांत चौधरी यांनी डॉ. ठाणेदार यांच्या निवडीबाबत माहिती दिली. यूएसएच्या ऍक्रॉन विद्यापीठातून पॉलिमर केमिस्ट्री विषयात पीएचडीप्राप्त डॉ. ठाणेदार यांनी रसायन व औषधनिर्मितीचा उद्योग स्थापन केला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अमेरिकेतील तरुण उद्योजक म्हणून तीनदा सन्मानितही करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत