जागा वाटपावर संजय राऊतांचा भाजपाला इशारा

मुंबई : रायगड माझा वृत्त 

विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यामुळे बरेचजण जागावाटपावर त्यांची मते मांडत आहेत. केंद्रात मोदी सरकार आहे. यामुळे महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा अशी इच्छा व्यक्त केली तर त्यात गैर काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

     

बदलत्या काळानुसार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी बसण्याचा निर्णय घेतला असेल तर चुकीचे नाही. केंद्रात मोदींची सत्ता आमच्या मदतीनेच आली आहे. आम्ही जुळे भाऊ आहोत. मोठा-छोटा ही राजकीय व्याख्या राजकारणात बदलावी लागते, असे सांगत जागावाटपावर समसमानच जागा मिळतील असा संदेश राऊत यांनी दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि अमित शहा जे बोलतील तेच आम्ही ग्राह्य धरू, अन्य कोणी काय बोलते तर त्यांचे मत आम्ही मान्य करणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशिर्वाद यात्रा सुरू केली, त्यावरून त्यांना लोकांपर्य़ंत पोहोचायचे आहे. आदित्य यांना मी लहानपासून ओळखतो. वयात फरक असला तरीही आम्ही चर्चा करतो. लोकांना समजून घेण्याची त्यांची शक्ती मोठी आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.ब्युरो

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत