जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

मुंबई  रायगड माझा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये नीट (छएएऊ) व सीईटी (ण्एऊ) प्रवेश प्रक्रियेच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक होते. परंतू विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता जात वैधता प्रमाणपत्राची मुदत आता 10 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानूसार 30 जूनपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक होते. परंतू विद्याथ्रयांच्या अडचणी लक्षात घेता विद्याथ्रयांना ही मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास वर्ग, इतर मागास वर्ग आणि भटक्‍या जमाती जातप्रमाणपत्र कायदा 2000 यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आपले अर्ज दोन दिवसात जात पडताळणी समितीकडे सादर करावेत. जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रामुळे विद्याथ्रयांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. तसेच ही सवलत विद्याथ्रयांना यंदाच्या वर्षासाठीच लागू राहील, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

न्यायालयीन आदेशानुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंडरटेविैंग घेण्यावर स्थगिती दिलेली असल्याने, या न्यायालयीन निर्णयामुळे उपरोक्त व्यावसायिक पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकरीता प्रवेश प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागास देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत