जालनामध्ये गोठ्यास आग लागून 3 बालकांचा मृत्यू

भोकरदन : रायगड माझा ऑनलाईन 

bhokardan-fire-3-died

जालना जिल्हय़ात भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर गावात जनाकरांच्या गोठ्यास आग लागून तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संजीवनी गजानन मव्हारे, वेदांत विष्णू मव्हारे आणि सार्थक मारुती कोलते अशी मृतांची नावे आहेत. गोठय़ामध्ये सकाळी मुले दहाच्या दरम्यान भातुकलीचा खेळ खेळत होती, मात्र ही मुले खेळत असताना त्यांनी चूल मांडली असावी आणि त्या चुलीमध्ये त्यांनी अग्नी पेटवला. पण नंतर या आगीने गोठय़ाला घेरले व आग बघून ही मुले गोठय़ामध्ये असलेल्या एका दरवाज्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. मात्र संपूर्ण गोठा आगीने वेढला गेला आणि अवघ्या काही क्षणांतच सदरच्या गोठय़ाकरचे पत्रे खाली पडून ही मुले त्यामध्ये दबून गेली. त्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत