जालन्यात तोंडात फटाका फुटुन बालकाचा मृत्यू

जालना :  रायगड माझा ऑनलाईन 

दिवाळी येण्याअधिच प्रकाशमान करणाऱ्या सनावर काळोख पसरणारी घटना घडली असून तोंडात फटाका फुटुन बालकाचा मृत्यू झाला. या घटनेने भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे शोककळा पसरली आहे.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील यश संजय गवते (वय- ७) ह्याचा मंगळवारी  दु १२ वाजण्याच्या दरम्यान तोंडात फटाका फुटुन अपघाती मृत्य झाला.  घराच्या अंगणात खेळत असतांना त्याने अचानक घरात येऊन आगपेटी नेली. त्यावेळी घरात त्याचे वडील जेवत होते. बाहेर जोरात फटाक्याचा आवाज झाल्यावर ते धावत बाहेर गेले. बाहेर येऊन पाहतात तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात दिसला. यावेळी त्याला उपचारासाठी उचलून बुलडाण्याला नेण्याचा प्रयत्न केला असता त्याची वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत