जाेतिराव फुलेंच्या ‘महात्मा’ उपाधीला 130 वर्षे पूर्ण

 

पुणे : रायगड माझा

स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मूलन, संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह आणि सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणारे जाेतिबा फुले यांना ११ मे १८८८ राेजी मुंबईकरांनी ‘महात्मा’ ही उपाधी बहाल केली. सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी उपाधी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. अाज (दि. ११ ) या घटनेला १३० वर्षे पूर्ण हाेत अाहे.

 

अशी दिली उपाधी

जोतिबांच्या वयाला ६१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ११ मे १८८८ रोजी मुंबईतील भायखळ्याजवळच्या मांडवी-कोळीवाडा येथे आग्री, भंडारी, कोळी कामगार बांधव हजारोंनी एकत्र जमले. मांडवी-कोळीवाड्यातील रघुनाथ महाराज सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. भायखळ्याच्या परिसरात या दिवशी सणासुदीचा उत्साह होता. नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर सावळाराम यंदे, स्वामी रामय्या व्यंकय्या आय्यावारू, रावबहादूर वंडेकर, मोरो विठ्ठल वाळवेकर, भाऊ डुंबरे पाटील आदींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थित आग्री, कोळी, भंडारी समाजातील बांधवांनी जाेतिबांना ‘महात्मा’ ही उपाधी बहाल केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत